भारतीय हॅवमोर आईस्क्रीम कोरियन लोट्टे कन्फेक्शनरीच्या घशात
गेल्या पाच वर्षांत भारतातील आईस्क्रीमच्या विक्रीत दर वर्षी १३ टक्क्यांची वाढ झाल्याचं मिन्टेल्सच्या ‘आईस्क्रीम जागतिक वार्षिक आढावा २०१७’मध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारतात आईस्क्रीमचा खप २०१६ साली ३३४.४ दशलक्ष लिटर्स इतका होता. त्यात वाढ होऊन तो २०२१ साली ६५७.२ दशलक्ष लिटर्सवर जाऊन पोहचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोट्टेनं हॅवमोर खरेदीच्या निर्णयामागे ही बोलकी आकडेवारी आहे.......