विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......

पाककलेचा उत्तम आविष्कार केळीच्या पानांइतकाच पुस्तकातल्या पानांत अभिसारित होत अवतरतो, तेव्हा ‘रुचिरा’सारखी उत्तम कलाकृती निर्माण होते!

‘रुचिरा’ या श्रीमती कमलाबाई ओगलेकृत पाककला पुस्तकाचे २०२० हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. १९७०मध्ये ‘रुचिरा’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. अल्पावधीतच या पुस्तकाने विक्रीचे विक्रम तोडत मराठी पुस्तकजगतात आपले वेगळे स्थान निर्माण केले. या ५० वर्षांत या पुस्तकाच्या २०हून अधिक आवृत्त्यांच्या २, ५०,०००हून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. साऱ्या बदलांना पचवून ‘रुचिरा’चे हे अग्रगण्य स्थान अजूनही कायम आहे.......