तुकोबा अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे हे पुस्तक उदाहरण म्हणून पाहावे
तुकोबांचे काव्य व त्यावरून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे विश्लेषण व विवेचन, तसेच तुकोबांच्या अभंगातील आशयाचा परामर्ष घेणे, हे दुहेरी पैलू ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकात आले आहे. आधुनिक चित्रकलेत हे आव्हानात्मक आहे, हे चित्र-शिल्प तयार करताना जाणवत होते. समकालीन आधुनिक कलाविश्वात काम करताना त्याची जाणीव होती. तुकोबांच्या गाथेतील चित्र-शिल्प संकल्पनेची सुरुवात फारच उत्साही वातावरणात झाली.......