‘...चार आणे किलो... ईस पैस्या किलो... धा पैस्या, पाच पैस्या... आरं फुकट घ्या की मनावं...’
डिसेंबर महिन्यात नोटबंदीमुळे पडलेल्या भावाला कंटाळून नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी २० लाख टोमॅटो रस्त्यावर टाकून दिले, तर छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी अशीच कितीतरी टन टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. ५० पैसे किलो या भावानेही व्यापारी ते खरेदी करायला तयार नव्हते. सध्या मात्र टोमॅटोंचा भाव १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे इंदूरमध्ये तर काही टोमॅटो विक्रेत्यांनी त्याची चोरी होऊ नये म्हणून सुरक्षारक्षक नेमले आहेत.......