गदिमांचं वलय जसं कधीही न संपणारं आहे, तसंच माडगूळचंही आकर्षण कायम राहणार आहे, हे नक्की!
गदिमांच्या माडगूळचा आज मागमूसही आढळत नाही. कालोघात गावं बदलतात, परंतु एवढी बदलतात हे पटत नाही. १९७२च्या दुष्काळानंतर या गावाने पाऊस असा कधी बघितलाच नाही. पिण्याचे पाणीसुद्धा टँकरच्या पाण्याने पिणारे माडगूळ पाहिल्यावर हे गाव हिरव्या रंगाची शाल पांघरल्याचे गाव होते, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. गावाशेजारचे ओढे आटलेत, व्यंकटेशतात्यांच्या पांढर्या खडकाचे अस्तित्वही शिल्लक नाही.......