दीर्घकथेला मराठी भाषेतून काहीएक दर्जा किंवा मान्यता मिळाल्यास अन्य भाषांनादेखील तो विचार मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरू शकेल
लघुकथा हा दुय्यम साहित्यप्रकार आहे किंवा क्षुद्र साहित्यप्रकार आहे, अशा आशयाची टीका झालेली आहे. या टीकेचा एक मानसशास्त्रीय परिणाम असा झाला की, काही लिहिते लघुकथाकार लघुकथा लिहिता-लिहिता थबकले, थांबले आणि त्यांनी आपला मोर्चा कादंबरीकडे वळवला आहे. यातून कादंबरीविश्वाचं भलं झालं की नाही, हा संशोधनाचा विषय असला तरी, लघुकथेच्या क्षेत्राचं मात्र नुकसान झालेलं आहे.......