लॉकडाउनच्या काळात खिडक्या माणसांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू लागल्या आहेत!
इराण आणि इटलीमधील बाल्कनींमधून समूहस्वरात म्हटलेली गाणी, न्यूयॉर्कमधल्या चौथ्या मजल्यावरच्या खिडकीमधून फादरनी लावून दिलेले लग्न, आणि हो अर्थातच प्रधानमंत्र्यांच्या सूचनेबरहुकूम भारतीयांनी केलेला घंटानाद आणि थाळीनाद - या साऱ्या घटनांवरून आपणाला नुकतेच हेही उमगून चुकते की, ही खिडकी म्हणजे एकमेकांना अचानकपणे जोडणारा प्रदेश असतो. लॉकडाऊनमुळे आपणा सर्वांना ‘खिडकीशेजारील जगाचे नागरिक’ बनवले आहे.......