गुलामी त्रासदायक होती, तशीच ती न्यूनत्वाची व कमीपणाचीही खूण होती!
तेथे सरकारी अधिकाऱ्यांनी भाषण केले व स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचून दाखवला. आता आम्ही आपापल्या मर्जीनुसार कधीही व कोठेही जाऊ शकणार होतो, हे जेव्हा माझ्या आईला समजले तेव्हा तिने सर्व मुलांचे पापे घेतले व तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हे सर्व तिने आम्हाला समजावून सांगितले. हा दिवस आपल्याला पहायला मिळेल याची मात्र तिला खात्री नव्हती.......