आजच्या युगात शिक्षक ‘डिलीट’ होणार नाही, याची काळजी त्याने स्वतःच घ्यायला हवी!
विद्यार्थी घडवताना खरं तर शिक्षक स्वतःलाही घडवत असतो. त्या दृष्टीनं आजन्म विद्यार्थी असणं ही खऱ्या शिक्षकाची ओळख असते. काळाबरोबर होणारे बदल टिपत त्यानं भविष्यात येऊ घातलेल्या अनेक गोष्टींशी स्वतःला जुळवून घ्यायला हवं. तरच शिक्षक म्हणून तो अधिक सक्षमपणे उत्तम काम करू शकेल. तरच नव्या शिक्षकाला नवा ‘शिक्षक दिन’ साजरा केल्याचं समाधान मिळेल!.......