आज एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना, दुसरीकडे इथल्या भटक्या विमुक्तांना आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करता येत नाही, अशी विदारक स्थिती पाहायला मिळते

दर पाच वर्षांनी येणाऱ्या राजकीय निवडणुकांमध्ये अनुभवांती पसंती-नापसंतीनुसार राज्यकर्ते निवडण्याचे अधिकार मतदारांना आहेत. सर्व समाजाच्या व्यापक हितासाठी स्वतंत्र बुद्धीने व निर्भयपणे मतदान करणे हा राजकीय प्रामाणिकपणा होय. आपल्या समाजव्यवस्थेत असलेली ऐतिहासिक विषमता, काहींचे शोषण, काहींकडे होणारे दुर्लक्ष, यांवर मात करून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे.......