डॉ. अनिकेत जावरे : कोणत्याही कळपात न रमलेला आणि स्वतःचाही कळप न काढलेला उत्तर-संरचनावादी अभ्यासक
जावरे सरांची ओळख उत्तर-संरचनावादी अभ्यासक म्हणून राहिली. हाच विचार त्यांच्या केंद्रस्थानी राहिला. या विचारांच्या अनुषंगानं त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं. या विचारविश्वातून त्यांनी दलित साहित्य, भाषाविज्ञान, पाश्चात्य विचारवंत, चित्रपट समीक्षा इत्यादी विषयांकडे पाहिलं. उदा. गोडसे भटजी यांच्या ‘माझा प्रवास’चा अनुवाद करत असताना, बाबुराव बागूल यांच्या कथेचा अनुवाद केला.......