‘बबऱ्या, स्सालं, पोकळीवाले लेखक शिलकीत ऱ्हायलेत का न्हाईत? की सारा जमाना पुंगळीवाल्यांचाहे?’
रिपीटेशन सोडलं तं मान्साची बायोग्राफी आस्तीच किती? ओढूनतानून पंचवीस तीस पानात तं सारं आटपून जातं. कवाकवा तं सोळा पॉइंटात मॅटर चालवावं लागतंय आन् तरीबी फोटोफिलर टाकायचा टाईम येतो. त्याच्याबी नंतर मिनतवाऱ्या करून दोनपाच लोकांचे आर्टीकल मागवावे लागतेत तवा कुठं सत्तरऐंशी पानं व्हतेत........