नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयांची संलग्नता संपवण्याच्या मार्गावरून चालताना फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे
गुणवत्ता वृद्धीसाठी संलग्नीकरण व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. तथापि, त्यांचा आकार आणि महत्त्व लक्षात घेता महाविद्यालयं उच्च शिक्षण व्यवस्थेमधील एक महत्त्वाचा भाग आहेत. संलग्नीकरण व्यवस्था बाद करण्यापूर्वी अत्यंत कडक उपाययोजनांचा अवलंब करणं, हे खरं तर भारतातील उच्च शिक्षणातील तीन चतुर्थांश विद्यार्थी प्रवेशाला मोठीच हानी पोचवणारं ठरेल.......