या खंडप्राय देशात ग्रेटा थुनबर्गसारखी जन्माला आलेली मुलगी मला पाहायची आहे.
जेव्हा विश्वाच्या भल्याचा विचार मागे पडतो आणि केवळ राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य मिळते, तेव्हा माणसांमाणसांमध्ये जातिधर्मावरून विभागणी केली जाते, तेव्हा मानवतेची मोठी हानी होते. माणसाचे जग कुटुंबापुरते मर्यादित होते, तेव्हा बेगडीवादाला आणि चंगळवादाला आमंत्रण मिळते. जेव्हा माणसाचे हृदय पोकळ होते, तेव्हा ते आपले घर उंची फनिर्चरने सजवत असतो. मग आपले घरगुती कार्यक्रम श्रीमंतीचे देखावे बनतात.......