गीतांजलीच्या कविता अगदी साध्या आहेत. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. म्हणून ही खरी कविता आहे.
गीतांजलीचा जन्म १२ जून १९६१ रोजी झाला. ती कॅन्सरने मुंबईत १२ ऑगस्ट १९७७ रोजी देवाघरी गेली. या निरागस बालिकेच्या कविता अगदी साध्या आहेत. शब्दांची अडचण कुठेही जाणवत नाही. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. पण भावना वारंवार जाणवतात. म्हणून ही खरी कविता आहे. त्या कुणीही वाचाव्यात, डोळ्यात अश्रू यावेत, गळा दाटून यावा. हीच तुमची गीतांजलीला श्रद्धांजली!.......