आठवणी गुरुजींच्या
वैचारिक निष्ठा आणि वैयक्तिक ऋणानुबंध यात मानसिक संघर्ष निर्माण करणारे प्रसंग गुरुजींच्या आयुष्यात अनेकदा आले. त्या वेळी सारे दोषारोप सहन करूनही त्यांचा कल मानवी संबंधांकडे अधिक झुकलेला असे. जीवनावरील व माणसांवरील अतीव श्रद्धेने ते असेच वागत राहिले. स्वत: स्वीकारलेल्या वैचारिक तत्त्वाविरुद्ध वागून लोकनिंदेने भाजून जात असताना आपण कुणाच्या तरी ऋणाची किंमत मोजत आहोत, यात अंतिमत समाधान आहे.......