कुठे गेले सारे बुद्धिवादी?
आज बुद्धिवाद्यांचे नेमके स्थान काय, या प्रश्नाचे उत्तर शोधू गेल्यास नजरेसमोर साकारणारे चित्र हुरूप वाढवणारे अजिबातच नाही. देशातील वैचारिकतेच्या मुख्य धारेतून अलीकडील काळात बुद्धिवादी बाजूला फेकले जात आहेत. सामाजिकदृष्ट्या ही एक चमत्कारिक अशीच बाब मानावयास हवी. या इतक्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील घटिताकडे अजूनही फारसे कोणाचे लक्ष वेधले जात नाही, गेलेले नाही, ही तर त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हटली पाहिजे.......