जर ‘डिजिटल माध्यमां’ना आपल्या विचारांनुसार चालवण्याचा राजकीय प्रयत्न यशस्वी झाला, तर पत्रकारितेचं काही प्रमाणात राहिलेलं स्वतंत्र अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही

स्वतंत्रपणे पत्रकारिता करणार्‍यांसाठी ‘डिजिटल माध्यम’ खुलं आहे. मीडिया हाऊसेसवर असलेला दबाव, त्या ठिकाणी असलेली पत्रकारितेची नोकरी आणि दबावामुळे होणारा मानसिक त्रास, यामुळे डिजिटल माध्यमाकडे एक संधी म्हणूनही बघितलं जातं आहे. ही माध्यमांमधली खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणावी लागेल. मात्र ही माध्यमं जितक्या मुक्तपणे बातम्या देण्याचं काम करतात, तितक्याच प्रमाणात काही विशिष्ट वर्गाकडून याचा गैरवापरही केला जातो.......