जीव तपशिलांच्या नजरकैदेत तळमळतो... (कादंबरीअंश)
कुठल्याशा फुलाचा मंथर वास आल्यासारखं वाटतं. महाळगावची गणपती मंडळं रोज रात्री नाटकं करतात. त्याला ‘डेकोरेशन’ म्हणतात. चुकूनही ‘नाटक’ म्हणत नाहीत. एकदा गावहोळी चौकातल्या प्रसिद्ध मंडळात त्याचा एक वर्गमित्रच ज्ञानेश्वर झाला होता. तलम सोवळं नेसून कुटीबाहेर तो मित्र उभा आहे आणि त्याच्या खांद्यावर एक शुभ्र कबुतर येऊन बसतं. लोक टाळ्या वाजवतात. क्षितिजापासून हूल उठते. पिक्चरमधला समाधीचा प्रसंग परत आठवतो.......