दिलीप माजगावकर मराठी प्रकाशनक्षेत्रात ‘मशागतीच्या माळीकामा’त रमले. त्यांनी वाचकांच्या मनात चांगल्या साहित्याची जाण पेरली
दिलीपरावांचे लेखन, भाषणे, मुलाखती यांच्यातील महत्त्वाचे गुण म्हणजे त्यांची निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता. यातील सातत्य विस्मयचकित करणारे आहे. ही निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता व्यक्तीबद्दल, व्यवसायाबद्दल, साहित्याबद्दल आणि त्यापलीकडे अवघ्या समाजाबद्दल दिसते. दिलीपराव ही व्यक्ती त्यांच्या भिडस्त स्वभावामुळे स्वतःला लेखक मानत नसली, तरी त्यांच्या लेखनातून हे चिंतन अल्पाक्षरात आणि म्हणूनच रेखीवपणे प्रकट होत असते.......