हा देश केवळ मतदारांच्या सर्वाधिक संख्येमुळे जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवतो, हे हास्यास्पद आहे. निवडणूक हे इथलं सर्वांत लोकप्रिय आणि खर्चिक असं प्रहसन आहे!
भारतीय मतदार ढोबळमानानं ‘ठेविले अनंते…’ वृत्तीचा अल्पसंतुष्ट, ‘कुणीही निवडून आलं तरी काय फरक पडणार आहे?’ वृत्तीचा राजकीय निराशावादी, ‘यात माझा काय फायदा?’ असा नजीकच्या नफ्याचा विचार करणारा स्वार्थी आणि ‘आपला माणूस कोण?’ या विचाराचा जातीयवादी अशा गटांत विभागता येईल. एकविसाव्या शतकातही मूलभूत गोष्टींवर सरकारला धारेवर धरण्याची राजकीय परिपक्वता या समाजात अजून का आलेली नसावी?.......