आपल्याला हव्या होत्या त्या प्रिय देशामध्येच ते जणू निर्वासित बनून राहिले होते.
आज पाकिस्तानातील, जगाचं भान असणाऱ्या बुद्धिवादी, विचारवंत, लेखक, कलावंतांची होणारी घुसमट आणि तेथील सामाजिक, धार्मिक, राजकीय अवकाशातील अपरंपार अस्वस्थता याची पाळंमुळं फैज यांच्या लेखात आणि त्यांच्या मुलाखतीत सापडतात. पाकिस्ताननं आपल्या सांस्कृतिक वारशाऐवजी इस्लामचीच निवड केलेली दिसते आणि आजच्या घटकेला तर पाकिस्तानची एक दहशतवादी देश म्हणून जगभर बदनामी झाली आहे.......