तिथं वैनतेय होता. ते आवाज तिथूनच येत होते. कारण वैनतेयच ते काढत होता.
‘वैनतेय : एक गरुड योद्धा’ ही प्रतिक पुरी या तरुण कादंबरीकाराची नवी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. वैनतेय! अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा! एक गरुड योद्धा! मनुष्य आणि सुवर्ण-गरुडांचे गुणधर्म असणाऱ्या वैनतेयच्या आयुष्यात पावलोपावली संकटं येतात. सर्पविश्वातील सर्प आणि कापालिक गुरू शतचंडी तर त्याच्या जीवावर उठतात. एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंतचा हा प्रवास विलक्षण आहे, थक्क करणारा आहे.......