एखादी साथ पसरते कशी आणि लॉकडाऊनशिवायही ती रोखता येते कशी?
लॉकडाऊनमुळे गर्दीचे प्रसंग घडत नाहीत हा एकमेव फायदा आहे, एवढेच. परंतु लॉकडाऊनची किंमत प्रचंड असते - रोजगार बुडतात, उपासमार होते, अर्थव्यवस्था ठप्प होते, आत्महत्या वाढतात, शिक्षण बंद पडते, नैराश्य येऊ शकते इत्यादी इत्यादी. ही किंमत टाळून गर्दीचेही प्रसंग टाळण्यासाठी अनेक कल्पक मार्ग असू शकतात. हडेलहप्पीने ते साधत नाही.......