‘समतेशी करार’ या पुस्तकात कल्याणकारी राज्याच्या ऱ्हासानंतरची समतेपुढील आव्हाने स्पष्ट केली आहेत…
मधु कांबळे यांनी गेल्या तीस वर्षांत बंदिस्त झालेल्या समाजाला आणि राजकारणाला प्रश्न विचारला आहे. आरक्षण, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करून समता येईल का? आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करून पर्यायी समतेसाठी व्यवस्था निर्माण करता येईल का? हे प्रश्न समाजाला आणि राजकीय व्यवस्थेला विचारले जात नव्हते. समतेसाठी पर्यायी व्यवस्था सुचवली जात नव्हती.......