जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती
अत्रे नामक मशालीची ज्वाला नव्या नव्या तेलाने भडकलेलीच होती! तोलून मापून, हातचे राखून जगणे किंवा शब्दापासून प्रकृतीपर्यंत कशाला जपणेही हे त्यांच्या पिंडाला ठाऊकच नव्हते! महाराष्ट्र देशाच्या वर्णनात अत्र्यांच्या साहित्यगुरू गडकऱ्यांनी, त्याला ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा-नाजूक देशा, कोमल देशा फुलांच्याही देशा’ असे म्हटले आहे. महाराष्ट्र देशाइतकेच हे वर्णन राम गणेशांच्या या शिष्यालाही लागू पडते.......