“देव ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीनुरूप इतकी बदलत जाणारी आहे की, या प्रश्नाचे फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ या शब्दांत उत्तर देणे दिशाभूल करणारे असेल” - जयंत नारळीकर
‘हे जग विज्ञानाच्या नियमांनुसार का चालते?’ किंवा ‘कोणी ठरवलं की याच नियमांनी चालेल आणि इतर कोणत्या नियमांनी नाही?’ असे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत. या प्रश्नांना फक्त ‘देव’ असं उत्तर दिल्याने आपण फार काही मोठी मजल मारत नाही. निसर्गाचे काही मूलभूत नियम आहेत आणि ते शोधून काढणे हेच विज्ञानाचे जाहीर उदिष्ट आहे, हा विश्वास वैज्ञानिकाला असतो.......