२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशातील दलित-बहुजनांचे आर्थिक-सामाजिक प्रश्न व गरजा चव्हाट्यावर आणण्याच्या राजकारणाला धुमारे फुटत आहेत

यंदा उत्तर भारतात, किमान वरकरणी तरी असे भासते आहे की, दलित-बहुजन मतदार केवळ सामाजिक-आर्थिक मुद्द्यांनाच महत्त्व देत नसून ते मोदींनी उभारलेल्या हिंदू विरुद्ध मुस्लीम या प्रचाराच्या चौकटीवरदेखील नाराजी दर्शवत आहेत. दलित-बहुजन वर्गाने मोदींच्या हिंदुत्ववादी राजकारणाविरुद्ध केलेला हा विद्रोह आहे. इतिहासात फारच कमी विद्रोह यशस्वी झाले आहेत, परंतु प्रत्येक विद्रोह भविष्यातील परिवर्तनाचे मार्ग तयार करत असतो.......

अमेरिकेवर ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा जो परिणाम झाला होता, तोच हमास व इस्लामिक जिहादने ७/१०ला इस्त्राएलवर केलेल्या हल्ल्याचा होणार आहे…

पॅलेस्टिनी स्वातंत्र्याला अव्हेरत नव्या मध्य-पूर्वेचे सृजन करण्याचे इस्त्राएल-अमेरिकेचे प्रयत्न हमासने एका दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त केले आहेत. अर्थातच हमासच्या कृतीने पॅलेस्टिनी स्वातंत्र्याचा प्रश्न सुटणारा नाही. याचा अर्थ पॅलेस्टिन-इस्त्राएल वाद व संघर्ष ७५ वर्षांपूर्वी जिथे होता, तिथेच आहे. वसाहतवाद, दोन महायुद्धे आणि शीतयुद्ध यांनी तयार केलेले संघर्ष न सोडवता जगात शांतता प्रस्थापित होणार नाही.......

भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे!

राज्यघटनेप्रती निष्ठा असलेले सर्व नागरिक ‘भारतीय’ आहेत असा अभिमान बाळगणारे भारतीय आणि भारतातील सर्व १३० कोटी लोकांना हिंदू ठरवण्याचा दुराग्रह असलेले धर्मांध नेतृत्व यांच्यातील हा संघर्ष आहे. भविष्यातील भारत हा धर्म-आधारित भगव्या राष्ट्रवादावर आधारित असेल की, सर्व धर्मांना व निधर्मियांना समान स्थान असलेला सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादावर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे.......