महायुतीच्या राज्यातील दारुण पराभवाने ना ‘खरी शिवसेना’ कोणती हा प्रश्न सुटला, ना उद्धव ठाकरेंच्या दीर्घकालीन दिशेबद्दल आश्वासकता निर्माण झाली... पिच्चर अभी बाकी हैं!
या निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यतः चार मुद्दे भाजपच्या विरोधात गेले. एक, राज्यघटना बदलण्याच्या हेतूबद्दल खोल शंका; दोन, पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर; तीन, शेतकऱ्यांचा असंतोष आणि चार, मराठा आरक्षणाचा मुद्दा. नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस या दोघांनाही राज्यात ‘काउंटर नॅरेटिव्ह’ उभारता आले नाही, हे भाजपच्या प्रचारातील लक्षणीय अपयश होते.......