भारतानं नेहरूंचे कशासाठी आभार मानले पाहिजेत?
नेहरूंची भारतीय विज्ञानावरची मोहर भारतभरात पसरलेल्या डझनावारी वैज्ञानिक संस्थांतून आणि विद्यापीठांतून दिसून येते. नेहरूंमुळेच त्यांची निर्मिती झाली आहे. कदाचित भारत हा जगातील एकमेव देश असेल, ज्याच्या राज्यघटनेनं ‘वैज्ञानिक वृत्ती’शी आपली बांधिलकी जाहीर केली आहे. ही कल्पना खास नेहरूंची आहे. ते तुरुंगात असताना तिनं त्यांच्या मनात आकार घेतला होता.......