आमचा टाहो या तथाकथित देवदेवतांना कळलाच नाही, ना त्यांनी आमचे रक्षण केले. मग मी त्यांना देव का मानावे?
एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं, हे सर मला या घुंगराचं निमित्त काढून पाठीमागचा वचपा काढताहेत. मी आणखीन बेफिकीर, आज मार खात रहायचं. मग सरांनी हाताऐवजी पार्श्वभागावर काठी चालवायला सुरू केली. चुकून हात मध्ये आला. काठीचे दोन तुकडे झाले, हातातून असह्य वेदना, डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मटकन खाली बसलो. रागातच उठलो, काही तरी ठरवून, पण अनर्थ टळला… सर पसार झाले होते.......