लोकमान्य टिळकांची ज्ञानपिपासा, लोकसंग्राहक वृत्ती, गणिती तर्ककठोरता, जिज्ञासा, मर्मभेदी अकृत्रिम भाषाशैली यांचा विचार केला की, त्यांच्या श्रेष्ठत्वाचं रहस्य उलगडतं…
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वं, कायद्याचं राज्य जोपासणारी लोकशाही व्यवस्था, भावनिक ऐक्य व सांस्कृतिक ओळख जोपासणारा राष्ट्रवाद, बुद्धिवाद, खुल्या व्यापाराचा पुरस्कार करणारं अभिजात अर्थशास्त्र, धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र या सगळ्यांतून घडलेली आधुनिकतेची विचारचौकट टिळक-आगरकरांना परिचित झाली. या वाटेवरूनच टिळकांची पुढची वाटचाल झाली.......