अरुण फडके : प्रामाणिक, निर्भीड, व्यासंगी आणि ‘मराठी लेखन कोशा’चे शिलेदार
अतिशय साधे, सौम्य, संयत, पारदर्शी, ऋजू परंतु निग्रही व्यक्तिमत्त्व. समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या मतांचाही आदर ठेवणारे. आपल्या अभ्यासपूर्ण तत्त्वांशी ठाम असणारे, पण एखाद्याने तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले मत मांडले तर त्याचाही स्वीकार करणारे. एवढे मौल्यवान कार्य करूनही, कुठेही ‘मी’पणाचा लवलेश न दर्शवणारे. आपल्याकडील ज्ञानाचा, माहितीचा कोणताही बडेजाव त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीच दिसला नाही.......