डॉ. अनंत देवीदास (बाळासाहेब) अडावदकर : गांधी-विनोबा हे त्यांचे अभ्यास विषय होते, तर विवेकानंद हे श्रद्धास्थान होतं
विनोबा हा त्यांचा अभ्यास विषय होता. ते समजून घ्यायला हवे असतील तर आधी गांधी अभ्यासायला हवेत म्हणून त्यांनी समग्र गांधी वाचून काढले. मग ते विनोबांकडे वळले. गांधी-विनोबा हे त्यांचे अभ्यास विषय होते, तर विवेकानंद हे श्रद्धास्थान होतं. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्यावर बाळासाहेबांचं भाषण ऐकणं ही एक वेगळीच अनुभूती होती.......