माणसांना (आणि त्यातही आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या लोकांना) स्वतःशी जोडणं, मग आपल्या मित्रांना एकमेकांशी जोडणं हा जणू त्यांचा छंदच होता
नंदाकाकांचा फार मोठा आधार वाटे. त्यांनी कित्ती लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित केलं असेल, याची काही मोजदादच नाही. किंबहुना काकांना गेली अनेक वर्षं ओळखणारे त्यांचे मित्र त्यांच्या इतक्या आठवणी सांगत असतात की, एकेकदा त्यांचा हेवाच वाटतो. त्या सगळ्यांच्यात काका झिरपलेले दिसतात. अंश अंश गोळा केला, तर त्यांच्यातून थोडेसे काका यापुढेही भेटत राहतील.......