‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ : अंतर्मुख करायला लावणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे
‘सर्व माणसं समान आहेत’ हे तत्त्व भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही परस्परविरोधी विचारधारा मानतात. मात्र त्या दोन्हींमधील फरक स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांच्या अंगानं पाहिला, तर लक्षात येतो. स्वातंत्र्य हे मूल्य वाढीस घालताना भांडवलवादाचं समतेकडे दुर्लक्ष झालेलं असतं. वेगवेगळ्या ‘इझम’चं सामर्थ्य आणि मर्यादा खरे सर त्यांच्या नेहमीच्या परखड शैलीत मांडतात.......