‘ते पन्नास दिवस’ : मानवी जीवनातल्या आशा-निराशा, सुखदुःख, अहं, ईर्ष्या, अपमान, अवहेलना अशा चढ-उतारांचं मनोज्ञ दर्शन घडवत ही कादंबरी आपल्यालाही एका प्रवासाला घेऊन जाते
या कादंबरीचे दृश्य खलनायक आहेत - अचानक लादलेली टाळेबंदी, तिची निर्घृणपणे अंमलबजावणी करणारे प्रशासन आणि आपापल्या घरात सुरक्षित बसलेले लोक, आणि त्यांच्या असहायतेचा फायदा उचलणारे दुकानदार, व्यापारी. मात्र कादंबरीकाराच्या दृष्टीतून खरे खलनायक आहेत- जात, धर्म, त्यातल्या निरर्थक कालबाह्य चालीरिती यांना माणसापेक्षा जास्त महत्त्व देणारी मानसिकता.......