जातीव्यवस्थेपेक्षा जातीयतेचा प्रश्न सर्वांत मोठा आहे. ती मानसिक विकृती आहे!
ज्या दुर्दम्य कल्पनाविलासावर भारतातील धार्मिक-सामाजिक व्यवस्था उभी राहिली आहे, त्या धारणांना आव्हान म्हणून पुरातत्त्व, पुराभाषाशास्त्र आणि अनुवांशिकीच्या संशोधनाला प्रस्थापित करायला हवे. ज्या धार्मिक संकल्पनांच्या आधारे जात्युत्पत्तीला, जन्माधारित वर्णव्यवस्थेला प्रस्थापित केले आहे, त्याला ग्रंथांचे प्रामाण्य दिले आहे, ते भाषाशास्त्राने संपवून टाकल्यानंतर, त्याचा वापर कोणी केला नाही, तो करायला हवा.......