समाजवादी आणि गांधीवादी जीवनदृष्टी घेऊन राजकारण करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या, कर्तबगार, तऱ्हेवाईक, तसेच ‘यशस्वी’ माणसांचा घेतलेला हा शोध आहे
लोकोत्तर व कर्तबगार व्यक्तींच्या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने जात, धर्म, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजिक न्याय, समाजवादी राजकारण, हिंदुत्ववाद्यांचे देशाला विषमतेकडे आणि दुःस्थितीकडे नेणारे धोरण या साऱ्यांची चर्चा ‘व्यक्तिरंग’मध्ये येते. त्याचप्रमाणे गेल्या पन्नास-साठ वर्षांतील भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणूनही या पुस्तकाचे महत्त्व वादातीत आहे.......