दर्यागंज संडे बुक मार्केटमध्ये ‘ऐतिहासिक’ वास्तूंसारखीच ‘ऐतिहासिक बात’ आहे!
दिल्लीचं दर्यागंज संडे बुक मार्केट इंग्रजी क्लासिक पुस्तकांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. काफ्कापासून लॉरेन्स, विलियम्स थॅकरे, सर्व इथं मिळतात. अगदी अलीकडचे लेखकही मिळतात. दिल्लीच्या ग्रेटर कैलासमधून आलेले रोशन चतुर्वेदी इथं भेटले. ते म्हणाले “काफ्काचं ‘द कॅसेल’ २० रुपयात आणि ब्लादिमीर नोबोकोवची ‘लोलिता’ ५० रुपयांत जगात दुसरीकडे कुठे मिळेल का? मी दर आठवड्याला या क्लासिक पुस्तकांच्या शोधात इथं येतो.”.......