बाईंचं कौतुक करताना त्यांची जीभ थकत नाही. त्यांचा नवरा असल्याचा अभिमान आड येत नाही. उलट बाईंच्या प्रतिभेचं त्यांना कौतुक आहे!
आजही या वयात बाई आणि पाटील यांची पहिलीच इनिंग सुरू आहे असं वाटतं. परस्परांबद्दलचा विश्वास, कुतूहल, कौतुक आणि प्रोत्साहन, थट्टा आणि रागवणं या वैशिष्ट्यांनी त्यांचा संसार भरलेला आहे. त्यात कधीमधी आम्ही डोकावत असतो. त्यातूनच मला हे जाणवलं की, बाईंना पुरस्कार आणि प्रसिद्धीचं जास्त महत्त्व नसलं तरी त्या रूढ अर्थानं आज प्रसिद्ध आहेतच. त्यासाठी त्यांच्या माणसानं त्यांना दिलेली साथ मला स्त्री म्हणून कौतुकास्पद वाटते!.......