मी माझ्या आईव्यतिरिक्त आणखी चांगल्या आदर्शाची अपेक्षा करू शकत नाही!
आई म्हणून ती एकाच वेळी जशी शिस्तीची आहे, तशी ती काळजीवाहू, प्रेमळ आणि उत्तम संगोपन करणारीही आहे; आमच्यासाठी ती कायम उपलब्ध असते. आणि एक स्त्री म्हणून ती स्वतंत्र, स्वतःच्या अटींवर स्वतःचं करिअर घडवणारी, कामसू आणि उत्तम बायको आहे. नवरा असो वा नसो, आपण आपल्या पायावर उभं असणं, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं आईला कायमच महत्त्वाचं वाटत आलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच तिने आम्हालाही घडवलं.......