महाराष्ट्रातील १९४७ नंतरच्या जगात जगणाऱ्या बाईच्या आयुष्याचा संपूर्ण पटच येथे उलगडत जातो
या कादंबरीत एकीकडे स्त्री जात म्हणजे नेमके काय याचा वेध घेतला आहे, तर दुसरीकडे जाती जातीच्या विभेदनामध्ये स्त्री जातीचे काय होते, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. फुले, आंबेडकर, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे ही स्थानिक चौकट घेतानाच या कादंबरीच्या मागे ‘सेकंड सेक्स’ नावाचा ग्रंथ लिहिणाऱ्या आणि स्त्रीवादाला सैद्धांतिक पाया देणाऱ्या फ्रेंच विचारवंताचाही आधार आहे.......