आमचं क्रिकेट
कमिटीतलं कुणी येताना दिसलं की, तो तोंडात दोन हातांची दोन दोन बोटं घालून (इशाऱ्याची) कर्कश शिट्टी वाजवू शके. मग लगेच आम्ही खेळ थांबवून पळत असू. पण आम्हा मुलांना सोसायटीचे चेअरमन असलेल्या भाईसाहेब कर्णिकांचीच जास्त भीती वाटायची. ते गुलाबी गोरे होते आणि संतापले की लाल व्हायचे. नियम मोडून ही पोरं क्रिकेट खेळतायत असं त्यांना कळलं तर काय होईल, ते किती लाल होतील, या कल्पनेनेच आम्हा मुलांना घाम फुटायचा.......