हिरक महोत्सवी वर्षातच महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवर अधोगती!
‘आर्थिक पाहणी अहवाल’ राज्याच्या आर्थिक स्थितीचा आरसा मानला जातो. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे हा अहवाल दरवर्षी अंदाजपत्रकाच्या आदल्या दिवशी विधानसभेत मांडला जातो. २०१९-२० या वर्षाचा ‘महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल’ या मालिकेतील ५९ वा अहवाल आहे. १ मे २०२० रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीला ६० वर्षं पूर्ण होतील. त्यामुळेही हा अहवाल विशेष महत्त्वाचा ठरतो.......