नीतिन पवार : परिवर्तनाच्या चळवळीतील संघर्षयात्री
स्त्री, दलित, आदिवासी, हमाल, कष्टकरी आणि शोषित जनसमूह हे नीतिन पवार यांचे कार्यक्षेत्र आहे. लोकशाही, समाजवाद, इहवाद, विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती करण्यासाठी अहर्निश कृतिप्रवण राहणे, हा त्यांचा ध्येयवाद आहे. भारतीय संविधानातील ही मूल्य साकार व्हावीत, यासाठी ते सदैव कटिबद्ध आहेत. या सर्व चळवळीमागे त्यांच्या जीवनसाथी नंदिनी पाडपत्रीकर व मुले अमन व रोशनी यांचे प्रोत्साहन व सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.......