‘महाराष्ट्राच्या मानगुटीचा समंध’ : शेजवलकरांचा ८१ वर्षांपूर्वीचा मौलिक लेख
महाराष्ट्राला फार मोठा समंध बाधत आहे. त्याचे नांव इतिहास. इतिहास माणसाला शहाणा करतो असे बेकन समजत होता. पण आज इतिहास माणसाला पागल बनविताना दिसत आहे. जगांतील अनेक आपत्ति आणि अनर्थ इतिहासापासून निर्माण होताना दिसत आहेत. या सर्व प्रयत्नांची उत्तरक्रिया झाल्याशिवाय महाराष्ट्राला बरे दिवस दिसण्याची आशा नको! तोवर इतिहासाच्या क्षीराऐवजी दुरभिमानाचे काळे कुट्ट नीरच हाती येणार! तोवर हा इतिहासाचा समंध बाधतच रहाणार!.......