प्रत्येक लेखकास स्वतःचा सतत शोध घ्यावयाचा असतो. स्वतःला सोलून काढावे लागते.
‘प्रयोगशीलतेचा अभाव’ हे या साहित्याचे वैशिष्ट्य किंवा दोष म्हणा; पण ही वस्तुस्थिती आहे. भाषिक प्रयोगशीलता नाही, शैली किंवा निवेदनात प्रयोगशीलता नाही. मंदगतीने का होईना, आर्थिक उदारीकरणानंतर येथील स्त्री-पुरुषांच्या जीवनशैलीत, भावविश्वात सूक्ष्म बदल होत चाललेले आहेत. हे बदल ताकदीने व्यक्त करण्यात तिसऱ्या पिढीतील लेखक-कवी कमी पडत गेल्याचे जाणवते. अनुभूती-अभिव्यक्तीच्या पातळीवर विद्रोहाचे स्वर नाहीत.......