शब्द आहेत त्याच्याजवळ वाचा नाही आणि वाचा आहे, त्याच्याकडे इच्छा नाही!
दारूबंदीची चळवळ भली मोठी आहे, परंतु राजकीय, सामाजिक निष्क्रियतेने त्या चळवळीला पोकळ करून टाकले आहे! कुणाला मताचे राजकारण बोलू देत नाही, तर कुणाला स्नेहाचे संबंध बोलू देत नाहीत. बोलायचे, आवाज उठवायचा तर कुणाला जिवाच्या सुरक्षिततेची हमी वाटत नाही, तर ‘या नशेचा प्रादुर्भाव आपल्या घरापर्यंत नाही ना, मग कशाला त्यात पडा’, ही मानसिकता कुणाला याबद्दल बोलण्यापासून परावृत्त करते........