करोनावर मात करायची असेल तर लोकांना घरी राहू द्या, सुरक्षित राहू द्या!
जगभरात करोना हा बरा होणारा आजार आहे, हे माहीत असतानाही समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमे यांच्यामुळे करोना म्हणजे मृत्यू अशीच आशंका मनात दृढ होत गेली. प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने बातम्या दिल्या, त्यावरून कोणताही पेशंट कुठे मरून पडला, त्या रुग्णाला इतर चार आजार असले तरी त्याचा मृत्यू करोनाने झाला, अशा किती तरी बातम्यांनी नाहक भीतीचे वातावरण तयार झाले. मला वाटते, एखादा रुग्ण करोनाचा होता आणि त्याचा मी उपचार करत होते, .......